Monday, December 2, 2013

पैठणची दुरवस्था...... !

पैठण - प्रतिष्ठान - सातवाहनकालीन राजधानी पण आज या एकेकाळच्या वैभवी शहराची दुरवस्था पाहवत नाही.
पैठणला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पैठण एकेकाळचे सातवाहनांचे राजधानीचे शहर.  ज्ञानेश्वरांचे जन्म स्थळ आपेगाव पैठण पासून १६ किमी अंतरावर आहे.
नाथमहाराजांची कर्मभूमी पैठण. संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या पैठण्यांचे शहर पैठण.


आज मात्र पैठणला उतरती कळा लागली आहे. एकेकाळचे ऐश्वर्यसंपन्न शहर आज रस्त्यावरच्या फुफाट्यात आणि कचऱ्याच्या साम्राज्यात सापडले आहे.
सुधारणेच्या नावाखाली कॉक्रीटीकरण झालेल्या अनेक वास्तु शहरात पाहायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास सातवाहनकालीन नागघाट. याच घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले.  या घाटाचे महत्व सांगणारा याहून दुसरा दाखाला देण्याची गरज नसावी. घाटाचे कॉक्रीटीकरण हि सुधारणा नसून जाणूनबुजून घातलेला हातोडाच नव्हे का.



 नागघाटाच्या आसपास अनेक जुने वाडे व मठांचे अवशेष व निर्मनुष्य इमारती दिसून येतात. गावातच तीर्थाचा खांब व ज्ञानेश्वर उद्यान आहे.
शेतीच्या आणि तत्सम उद्योगधंद्यात पैठण प्रगतीपथावर असले तरी मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रस्त्यांचा अभाव घाणीचे साम्राज्य यामुळे पर्यटक पाठ फिरवतात.
दक्षिण काशीचे आजचे हे रूप बदलणे गरजेचे आहे.


नेवासा :
 या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.












No comments:

Post a Comment