श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्त्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्री समर्थांना जाणवली. श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्तहा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाज कार्यासाठी सतत झटणार असा होता . अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा होता श्री समर्थांचा विश्वास होता.
त्यांना इ.स.१६४४ मध्ये शहापूर (जि. सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायांची मुहूर्त मेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले .अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थांची स्थापना इ.स.१६४८ मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली व हेच संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
इ.स.१६४४ ते १६५२ या काळात अन्य दहा मारूतींची स्थापन करून एकूण अकरा मारूती स्थापना केले आणि श्री समर्थांनी रामदासी संप्रदायाच्या कार्याला चालना दिली.
श्री समर्थ व रामदासी संप्रदायाच्या सामाजिक कार्याचे महत्त्व ओळखून श्रीमंत छ्त्रपती शिवाजी महारांजानी ऑगस्ट १६४९ मध्ये चाफळजवळ शिंगाणवाडी येथे श्री समर्थांचा गुरुपदेश घेतला .छ शिवाजी महाराजांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री रामदास स्वामी.
श्री रामदास स्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला आहे.श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून इ.स.१६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले.त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरील मठ होय.श्री समर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून करुन घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम , लश्मण, सीता व मारूती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेव्ल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करून श्री समर्थांनी याच मूर्तीचे समोर माघ वदय ९ १६०३ (दि.22 जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला मठाचे उत्तरेस एक खळगा होता. येथे श्री समर्थांच्या देहावर शास्त्रोचित अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्री समर्थांचे शिष्य उध्दवस्वामी यांच्या हस्ते पार पडले.
No comments:
Post a Comment