Monday, December 16, 2013
Wednesday, December 4, 2013
Monday, December 2, 2013
पैठणची दुरवस्था...... !
पैठण - प्रतिष्ठान - सातवाहनकालीन राजधानी पण आज या एकेकाळच्या वैभवी शहराची दुरवस्था पाहवत नाही.
पैठणला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पैठण एकेकाळचे सातवाहनांचे राजधानीचे शहर. ज्ञानेश्वरांचे जन्म स्थळ आपेगाव पैठण पासून १६ किमी अंतरावर आहे.
नाथमहाराजांची कर्मभूमी पैठण. संपूर्ण जगाला भुरळ घालणाऱ्या पैठण्यांचे शहर पैठण.
आज मात्र पैठणला उतरती कळा लागली आहे. एकेकाळचे ऐश्वर्यसंपन्न शहर आज रस्त्यावरच्या फुफाट्यात आणि कचऱ्याच्या साम्राज्यात सापडले आहे.
सुधारणेच्या नावाखाली कॉक्रीटीकरण झालेल्या अनेक वास्तु शहरात पाहायला मिळतात. उदाहरणच द्यायचे झाल्यास सातवाहनकालीन नागघाट. याच घाटावर ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद वदवले. या घाटाचे महत्व सांगणारा याहून दुसरा दाखाला देण्याची गरज नसावी. घाटाचे कॉक्रीटीकरण हि सुधारणा नसून जाणूनबुजून घातलेला हातोडाच नव्हे का.
नागघाटाच्या आसपास अनेक जुने वाडे व मठांचे अवशेष व निर्मनुष्य इमारती दिसून येतात. गावातच तीर्थाचा खांब व ज्ञानेश्वर उद्यान आहे.
शेतीच्या आणि तत्सम उद्योगधंद्यात पैठण प्रगतीपथावर असले तरी मराठवाड्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या शहरात रस्त्यांचा अभाव घाणीचे साम्राज्य यामुळे पर्यटक पाठ फिरवतात.
दक्षिण काशीचे आजचे हे रूप बदलणे गरजेचे आहे.
नेवासा :
या गावातील करवीरेश्वराच्या देवळात राहून ज्ञानेश्वरांनी इसवी सनाच्या तेराव्या शतकात भावार्थदीपिका हा भगवद्गीतेचे मराठीत निरूपण करणारा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. ज्या मंदिरातील एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी आपली ज्ञानेश्वरी पहिल्यांदा वाचली तो खांब अजूनही नेवासे गावात आहे असे समजले जाते. याशिवाय, नेवासे येथे मोहिनीराजाचे एक जुने मंदिर आहे. पौराणिक कथांत लिहिल्याप्रमाणे भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप घेतले आणि भस्मासुराचा वध केला. जिथे हा भस्मासुराचा वध झाला ते ठिकाण म्हणजे नेवासे येथील हे मंदिर अशी लोकांची श्रद्धा आहे. हे मंदिर कलात्मकतेचा सुंदर नमुना असून, मंदिर स्थापत्य कलेच्या दृष्टीनेही विशेष महत्त्वाचे आहे.

Monday, November 18, 2013
हरिश्चंद्रगड आणि कोकणकडा - Harishchandragad
राजूर वरून पाचनई २७ कि.मि. आहे. रस्ता शेवटी ८-१० कि.मि. खराब आहे पण सह्याद्रीच्या बेलाग कड्यांची नक्षी आणि पार आभाळाला खेटलेल्या पर्वतांची शिखरे त्याची जाणीव होऊन देत नाहीत.
खालच्या बाजूला पाचनई गाव व मंगळगंगा नदी
डावीकडे मागे दिसतोय तो कलाडगड व त्यामागे रतनगड व खुट्टा सुळका
पाचनई गावातून थोडे वर चढून आले की हि घळ नजरेत भरते.
घळीला वळसा घालुन पुढे जावे लागते.
घळीची व्याप्ती लक्षात यावी म्हणून खालील फोटो दिला आहे .
रानडुकराच्या शिकारीसाठी गडावर निघालेले पाचनईतील गावकरी
पहिला टप्पा पार केल्यावर मंगळगंगा नदीचे पात्र समोर दिसते .
पात्रासोबत चालत राहिल्यास दहा ते वीस मिनिटातच दुरून हरिश्चंद्रेश्वर मंदिराशेजारील पुष्करणी नजरेत येते. पुष्करणीच्या आजूबाजूला अनेक मंदिरे व शिल्प विखुरलेली आहेत .
हरिश्चंद्रेश्वर मंदिरा शेजारीच पाण्याचे काही टाके आहेत. या टाक्यांमाधुनच मंगळगंगेचा उगम होत असावा.
हरिश्चंद्रेश्वर मंदिर
मंदिराच्या आवारात इतरही अनेक मंदिरे आहेत.
मंदिराचे अवषेश इतरत्र विखुरलेले दिसून येतात.
केदारेश्वर गुंफा :
शिवपूजन |
केदारेश्वर
|
तारामती शिखर
तारामती शिखर हे गडावरील सर्वोच्च ठिकाण आहे.
शिखरावर बालेकिल्ला आणि काही शिवलिंग आहेत. तसेच शिखराच्या पोटात काही कोठ्या व मंदिरे आहेत आहेत.
सहा फुटी गणेश मुर्ती |
निसर्गराजा
सोनकी |
Malabar crested lark |
सूर्यास्त (ठिकाण-पाचनई)
महत्वाची सूचना : १. कोकणकडा कितीही वेळा पहिला तरी तहान भागत नाही :) तेव्हा जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर गडावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
२. पाचनई ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार तारामती शिखराच्या उजव्या बाजूच्या डोंगरावर ( घळीच्या वर ) रानडुकरे आणि बिबटे आढळतात. संध्याकाळच्या वेळी तिकडे जाणे टाळावे.
Labels:
हरिश्चंद्रगड Harishchandragad
Location:Pune
Harishchandragad, Maharashtra 421401
Subscribe to:
Posts (Atom)