Tuesday, April 29, 2014

माझ्या कानड्या मल्हारी

 
 
महाराजसाहेब

शिवराय व शहाजी राजांच्या भेटीचा प्रसंग
महाराजसाहेब


किल्ले सोनोरी उर्फ मल्हारगड

महाराष्ट्रातील काही किल्ले पिकनिक स्पॉटस बनलेत मात्र काही किल्ले इतिहास उगाळीत आपले शेवटचे काही क्षण मोजत आहेत. असाच चाकोरीबाहेरील एक किल्ला म्हणजे किल्ले सोनोरी उर्फ मल्हारगड. पुण्यापासून साधारण ३० किमी अंतरावर तर दिवे घाटापासून १०-१२ किमी अंतरावर मल्हारगड आहे. दिवे घाट संपल्यावर डावीकडे झेंडेवाडी गाव आहे. झेंडेवाडीतून एक खिंड पार केल्यावर सोनोरीचे दर्शन होते. मल्हारगडावर जाण्याचा सर्वात सोपा मार्ग सोनोरी गावातून जातो. सासवडच्या अलीकडे सोनोरी गाव आहे. सोनोरी गावातून गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते.
गडाची उंची फारशी नाही १० ते १५ मिनिटात गडमाथा गाठता येतो. एका टेकडी वजा पठारावर किल्ला बांधलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे. गडाची तटबंदी बरीचशी ढासळलेली आहे. काही वाड्यांचे अवशेष, प्रवेशद्वारे, विहिरी, बांधलेलं तळ, एक शिव मंदिर व एक खंडोबाचे मंदिर या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाहण्यासारखे विशेष काही नाही. गडावरून दिवे घाट, पुरंदर, सासवड, जेजुरी पर्यंतचा प्रदेश दृष्टीपथास येतो.




तलाव




वाड्यांचे अवशेष





पानसे (गढी) वाडा