Monday, June 24, 2013

पेमगिरीचा किल्ला / भीमगड / शाहगड (Pemgiri Fort / Bhimgad / Shahgad -- Sangamner )

पेमगिरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातले गाव आहे. पेमगिरी संगमनेर तालुक्यात आहे. जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.

नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाहुन १४ किमी.
संगमनेर- अकोले रस्त्यावरुन कळस गावापासून १० किलोमीटर



पेमगिरी गावाजवळ जुन्याकाळी चुन्याच्या खानी प्रसिद्ध होत्या. त्याकाळी चुन्यात इथल्या येळुशीच्या दऱ्यातील 'पेमगिरी' कंद चुना प्रसिद्ध होता.
पेमगिरी गावात एक जुनी पायऱ्यांची विहीर आहे. तीत एक शिलालेखही आहे.

पेमगिरीचा किल्ला म्हणून ओळखला जाणारा भीमगड किंवा शाहगड इ.स. २०० मध्ये यादव राजांनी बांधला. या किल्ल्यावर पेमादेवीचे मंदिर असून पाण्याची टाके आहेत. दिल्लीचा मुघल सम्राट शाहजहान आणि विजापुराची आदिलशाही या दोन सत्तांनी १७ जुन १६६३ रोजी निजामशाही बुडविली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज मुर्तिजा निजाम याला जीवधनच्या कैदेतून सोडवुन संगमनेरजवळील पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशहा म्हणुन घोषित केले व स्वतः वजीर बनले. शहाजीराजांनी पेमगिरीच्या शाहगडावरून ३ वर्षे राज्यकारभार हाकला.

इ. स. १७३८ ते १७४० या दरम्यान बाजीराव पेशवे पहिले व  मस्तानी  यांनी शाहगडावरच वास्तव्य केले होते .

पेमादेवीचे मंदिर





मंदिराच्या नवीन इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.


गडावर पुरातन इमारतींच्या भिंतींचे अवशेष दिसून येतात.


बाळांतणीचे टाके






इतर पाण्याची टाके







गडावरून दिसणारा परीसर



गडावर जाण्यासाठी रस्ता बनविण्याचे काम प्रगती पथावर आहे. तरी गाडी थेट गडाच्या माथ्यापर्यंत नेता येते.  साहसी पर्यटकांसाठी गडावर शेवटच्या टप्प्यात शिड्या लावण्यात आल्या आहेत.


दक्षिणेस दोन किलोमीटर अंतरावर मोरदरा नावाच्या भागात एक विशाल वटवृक्ष आहे. वादळ-वा-याला तोंड देत अनेक वर्षांपासून तो तेथे उभा आहे. सुमारे दीड ते दोन एकरवर हा महाकाय वृक्ष पसरलेला आहे. त्याच्या मुख्य खोडाचा घेर ५८ फूट आहे. त्याच्या एकूण पारंब्या ९० च्या जवळपास आहेत. झाडाचा उत्तर-दक्षिण व्यास ३०० फूटांपर्यंत तर पूर्व-पश्चिम व्यास २८० फूट इतका मोठा आहे.
या वडाच्या झाडाखाली भिल्ल-रामोशांची 'जाखाई-जाकमतबाबा' ही दैवते आहेत. या दैवतांची दंतकथाही फार मोठी रोमांचकारी आहे. गुरं-शेळ्यांची राखण करणा-या रामोशी समाजातील जाकमतबाबाची जंगली वाघाशी झुंज झाली. रक्तबंबाळ झाले. पण दोघेही हटले नाहीत. अगदी अखेरपर्यंत! या रोमांचक संघर्षात वाघ आणि जाकमतबाबा या दोघांनीही येथेच अखेरचा श्वास घेतला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहिल्यावर बहीण जाखाईला दु:ख अनावर झाले. आणि भावाच्या कलेवरावर पडून आक्रोश करतच तिनेही प्राण सोडला. पुढे या जागेवर रामोशांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली.

मूर्तीची स्थापना केल्यानंतर पुढे झाडाचेही दैवतीकरण झाले. कुणी जाणीवपूर्वक फांद्या तोडल्या, पाने
तोडली तर जाकमतबाबा त्यांना चांगलाच धडा शिकवतो, यावर लोकांची दृढ श्रद्धा बसली. त्यामुळे झाडाचा कुणी विध्वंस करत नाही. परिणामी झाडाचे रुपांतर विशाल वटवृक्षात झाले. जेव्हा जेव्हा या वट वृक्षाला छाटण्याचा प्रयत्न झाला. त्या त्या वेळी त्या त्या लोकांना अद्दल घडली गेली, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. कारणं काहीही असोत, पण हा वट वृक्ष दिवसेंदिवस त्यामुळे विस्तारत गेला. आजमितीस हा महाराष्ट्रातला सर्वात विशाल वटवृक्ष आहे, हे नक्की. महाराष्ट्रातील हा महावृक्ष पाहण्यासाठी वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक, निसर्गप्रेमी या ठिकाणी आवर्जून येत असतात. कोलकात्याजवळील बोटॅनिकल गार्डनमध्ये आपल्या देशातील सर्वात विशाल वटवृक्ष आहे. देशभरात त्याखालोखाल येथील वटवृक्ष विस्ताराने मोठा असल्याचा दावा केला जातो.

Thursday, June 13, 2013

राजा दिनकर केळकर संग्रहालय ( Raja Dinkar Kelkar Museum - Pune )

डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी आज या दुनियेत नसले तरी त्यांनी उभारलेल्या राजा केळकर संग्रहालयातील प्रत्येक ऐतिहासिक वस्तूतून त्यांच्या अचाट परिश्रमाचे कौतुकबोल चिरंतन उमटत राहतील. राजाश्रयाशिवाय केवळ एक व्यक्ती असा अफाट संग्रह उभा करू शकतो हे केळकरांनी दाखवून दिले.

आपले पिढीजात चष्म्याचे दुकान चालवताना डॉ. केळकरांची शोधक दृष्टी मात्र गतकाळाचा वेध घेत होती. जुन्या सरदार घराण्यातील नाना वस्तू जमवण्याचा त्यांना छंदच जडला. मराठेशाहीतील एक प्रसंग या आपल्या कवितेत या अज्ञातवासींनी लिहून ठेवले होते की ' लाख होन खर्चूनी बांधिला रायांनी वाडा... अजून कुणाची द्यावयास वेढा ' . त्यांची स्वतःचीही स्थिती ' लाख क्षण वेचुनी उभारला केळकर संग्रहाचा डोळे दिपवून टाकणारा वाडा ' अशी होती.

अगदी फुंकणीपासून ते अत्तरदाणीपर्यंत त्यांनी रोजच्या वापरातील नाना चीजा जमा केल्या. विविध प्रकारचे दिवे , अडकित्ते , गंजीफा , सोंगट्या , शस्त्रे , पानदाने , पेटारे , दरवाजे , मूर्ती , कात्र्या , कळसूत्री बाहुल्या असा केळकरांचा खजिना समृद्ध , संपन्न होऊ लागला. कोथरुड येथून त्यांनी मस्तानीचा महाल उचलून आणला आणि संग्रहालयात हुबेहूब तसा उभा केला.

क्रौंचाच्या मृत्यूतून रामायण निर्माण झाले तर केळकरांचा मुलगा राजा याच्या मृत्यूतून संग्रहालयालाचे महाकाव्य जन्माला आले. त्यांनी संग्रहालयाला राजाचेच नाव दिले. हे संग्रहालय जुन्या वस्तूंचा मांडलेला नवा बाजार असून ते सुंदर काव्यच वाटते. पंधरा ते वीस हजार वस्तूंचे हे देखणे संग्रहालय पाहताना केळकरांनी त्यासाठी किती वणवण केली , सारा देश कसा पायथा घातला ते आठवत राहते.

१९२२ साली एका खोलीच सुरू झालेला हा अद्भुत संग्रहालय संसार वाड्याच्या वाड्याच्या सा-या दालनातून फोफावला आणि कीर्ती सुगंध तर परदेशातही दरवळला. राणी एलिझाबेथ यांनीही हे वैभव पाहून आनंदोद्गार काढले होते. केळकरांनी कधीच पैशाची पर्वा केली नाही. या छंदासाठी त्यांनी पत्नीचे दागिने विकले , एवढेच नव्हे तर पत्नीला वारसाहक्काने मिळालेले करमाळ्याचे घरही विकले. हातधुलाईचे धोतर आणि तसाच झब्बा घालून काका केळकर संग्रहालयातून फिरू लागले की त्या गतवैभवाचे तेज त्यांच्या डोळ्यातून त्यांच्या वाणीतून प्रकटू लागे.

कै. राम गणेश गडकरी हे त्यांचे गुरू होते. अज्ञातवासी नावाने ते कवी म्हणूने ख्यातनाम झाले आणि जे न देखे रवी ते अशी दृष्टी लाभलेल्या अज्ञातवासीनी अज्ञात इतिहासाच्या देशभरातील असंख्य गुहा ढुंडाळून चीजवस्तू जमवल्या. त्याच्यांतल्या कवी आणि त्यांच्यातला संग्राहक यांचा सुंदर मिलाफ संग्रहातील दिसतो आणि ऐतिहासिक वस्तूंबद्दलच्या प्रेमाच्या सामाजिक प्रगल्भतेचा वेगळा आविष्कार जाणवतो.

                                                                            
जय / Jay



सुर्य / Sun


कालियामर्दन कृष्ण आणि भगवान शिव / Krishna on Kaliyamardan and Lord Shiva



काली  / Maa kali


भगवान  गणेश / Lord Ganesh


गंगा - जमनी गडवे / Ganga - Jamni Vessels

अडकित्ता


तबक



तोफ गोळे / Cannon Balls


बारूद / Gun powder boxes


ताजमहाल प्रतिकृती / Model of Taj Mahal



चिलखत / Armor


राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता हनुमान

कृष्ण आणि सुदामा  / Kishna and Sudama

अश्वारूढ गणेश  / Lord Ganesh On The Horse

चर्मचित्र  / paintings on he Animal skin

भगवान  कृष्ण / Lord Krishna











सुर्य देव  / Lord Sun


मस्तानी महाल  / Palace Of Mastani

श्री विष्णू / Lord Vishnu



या संग्रहालयाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे दिवे आणि अडकित्ते. दिव्यांचे असंख्य प्रकार इथे बघायला मिळतात. लामणदिवे, समया, कंदिल यांचे नक्षीकाम केलेले अगणित प्रकार आहेत. मस्तानीचा महाल हे या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य. मस्तानीचा महाल बघतांना आपण नकळत त्याकाळात पोहचतो. लहान मुलांची खेळणी, जुन्या काळातील स्वयंपाकाची भांडी, जुनी शस्त्रास्त्रे, हस्तीदंती वस्तु, हस्तलिखीते, कातडी बाहुल्या, वस्त्र प्रावरणे, आरसे, जुन्या काळच्या प्रसाधनाच्या पेट्या म्हणजे आज ज्याला आपण मेकप बॉक्स म्हणतो त्यांचेही खूप प्रकार इथे बघायला मिळतात. या वस्तु त्यांच्या काळावधीनुसार वर्गीकरण करुन इथे ठेवण्यात आल्या आहेत. हा संग्रह बघतांना मानवी इतिहास आपल्यापुढे जिवंत होऊन उभा ठाकतो.


स्वतः केळकर आज भूतकाळाचा झाला असले तरी संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावरच लावलेल्या त्यांच्याच कवितेच्या ओळी त्यांची आठवण देत राहतात...
विसर मला पण न विसर ही येथील अमर कला ,
धुंद करील गतकालीन शिल्प इथे सहज तुला...

The Raja Dinkar Kelkar Museum is in Pune, Maharashtra, India. It contains the collection of Dr Dinkar G. Kelkar (1896–1990), dedicated to the memory of his only son, Raja, who died an untimely tragic death. The three-storey building houses various sculptures dating back to the 14th century.There are also ornaments made of ivory, silver and gold, musical instruments (a particularly fine collection), war weapons and vessels, etc.
The collection was started around 1920 and by 1960 it contained around 15,000 objects. In 1962, Dr Kelkar handed his collection to the Department of Archaeology within the Government of Maharashtra.
The museum now holds over 20,000 objects of which 2,500 are on display. These consist of mainly Indian decorative items from everyday life and other art objects, mostly from the 18th and 19th centuries. The museum's collection depicts the skills of the Indian artists of the time. The door frames, vessels, ornaments, musical instruments, paintings and carvings represent outstanding examples of their art.
One part of particular interest is the "Mastani Mahal". Raja Kelkar made a attempt at depicting the palace of Mastani, (wife of the Peshwa Baji Rao I) with its remnants. A beautiful piece in the collection is the carving of lord Ganesha on the seed; the idol of lord Ganesha is shown with his trunk towards the left, which is quite rare and difficult to build or draw.